जामनेरात बंद घर चोरट्यांना पर्वणी : एक लाख 68 हजारांचा ऐवज चोरीला
जामनेर (8 मार्च 2026) : जामनेर शहरातील आनंद नगर भागात भरदिवसा एका घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी एक लाख 68 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.
वाढत्या चोर्यांनी घबराट
फिर्यादी दरबार नवलसिंग राठोड (37, शिक्षक कॉलनी, जामनेर) हे आपल्या भाड्याच्या घरात राहत असताना ही चोरी झाली. मंगळवार, 3 मार्च रोजी दुपारी 12 ते 7 मार्च रोजी पहाटे सहा वाजेच्या दरम्यान फिर्यादी बाहेर गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या बंद घराला लक्ष्य केले. चोरट्यांनी घराच्या दरवाजाचा कडा तोडून आत प्रवेश केला. घरातील गोदरेज कपाटाचे लॉक तोडून त्यातील मौल्यवान दागिने चोरून नेले.









