जळगाव एमआयडीसीतील पोलिस कर्मचार्याची आत्महत्या
आत्महत्येमागील कारण अस्पष्ट ; पोलिसांकडून तपास सुरू
Suicide of a police officer in Jalgaon MIDC जळगाव (9 मार्च 2026) : जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यातील कर्मचार्याने मूळ गावी पोटगाव, ता.चाळीसगाव येथे गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. निलेश पाटील असे मृत कर्मचार्याचे नाव असून त्यांनी आत्महत्या का केली? याचे स्पष्ट कारण अद्याप समोर आलेले नाही.
मूळ गावी घेतला गळफास
जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात निलेश पाटील हे डीबी रायटर म्हणून कार्यरत होते. मूळ चाळीसगाव तालुक्यातील पोटगाव येथील रहिवासी असलेले निलेश पाटील शनिवारी गावी एक कार्यक्रमासाठी गेले होते. राहत्या घरात त्यांनी गळफास घेत जीवन संपवले.

सोमवारी सकाळी घडलेला प्रकार कुटुंबियांच्या निदर्शनास आला. घटनास्थळी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमीत मनेळ यांनी भेट दिली असून घटनेची माहिती घेतली आहे. घटनास्थळी पंचनामा सुरू असून मयताचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला.
निलेश पाटील यांनी आजवर उत्कृष्ट काम केले असून एक मनमिळाऊ व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. घडलेल्या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली असून अनेकांना धक्का बसला आहे.







