जळगावात पोलिसांच्या पेट्रोल पंपावर एक कोटी 33 लाखांचा अपहार : पसार फौजदारासह पूत्राला अटक


1.33 crore embezzlement at police petrol pump in Jalgaon : Pasar Faujdara along with his son arrested जळगाव (10 मार्च 2026) : जळगावातील पोलिसांच्या दक्षता पेट्रोल पंपावरील इंधन विक्रीतून आलेल्या 1.33 कोटी रुपयांचा पोलिस दलातील फौजदारानेच अपहार केला होता शिवाय या प्रकारानंतर संशयीत बेपत्ता झाल्याने प्रकरणाचे गुढ वाढले होते. पोलिसांकडून या प्रकरणात तपासाला वेग दिल्यानंतर अपहार करणारा संशयीत व पोलिस उपनिरीक्षक वाल्मीक वाघ पोलिसांना शरण आला व गुन्ह्यात संशयीताच्या मुलाच्या बँक खात्याचाही सहभाग समोर आल्याने शेखर वाल्मीक वाघ यासदेखील अटक करण्यात आली.

काय आहे प्रकरण ? 
जळगावातील पोलिस दलाच्या दक्षता पेट्रोल पंपाच्या दैनंदिन व्यवहारांची जबाबदारी वाल्मीक वाघ याच्याकडे व्यवस्थापक म्हणून होती. त्यांनी एक कोटी 33 लाख 752 रुपयांचा अपहार केल्याचे समोर आल्यानंतर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला मात्र या काळात वाघ पसासर झाला असतानाच त्यांच्या कुटूंबियांनी ते बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. दरम्यान, वाघ पसार असल्याने त्याच्या शोधार्थ पथके रवाना झाली असताना 9 मार्च रोजी तो स्वतः स्थानिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात हजर झाला. त्यांची पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, तपासाधिकारी राहुल गायकवाड यांनी चौकशी केली.



संशयीताच्या मुलाला अटक
वाल्मीक वाघ याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याच्या बँक खात्याची चौकशी केल्यानंतर अपहार काळात मोठ्या प्रमाणात रक्कम मुलाच्या खात्यात ट्रान्सफर झाल्याची शक्यता असून वाघ याच्या मुलाचाही गुन्ह्यात सहभाग असल्याच्या संशयावरून शेखर वाघला देखील अटक करण्यात आली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !