धुळे-नंदुरबारसह गुजरात, मध्यप्रदेशातून 18 दुचाकींची चोरी : त्रिकूट नंदुरबार शहर पोलिसांच्या जाळ्यात

नऊ दुचाकी चोरींबाबत पोलिसात गुन्हे दाखल : अन्य दुचाकींच्या मालकांबाबत आरटीओ प्रशासनाशी पत्र व्यवहार


गणेश वाघ
18 two-wheelers stolen from Dhule-Nandurbar, Gujarat, Madhya Pradesh: Triad caught by Nandurbar city police धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील विविध भागांसह गुजरात, मध्यप्रदेशातून तब्बल 18 दुचाकींची चोरी करणार्‍या शिंदखेडा तालुक्यातील त्रिकूटाला नंदुरबार शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर तब्बल नऊ दाखल असलेले गुन्हे उघडकीस आले असून अन्य दुचाकींच्या मालकांची वाहनांच्या इंजिन व चेसीस नंबरद्वारे खातरजमा केली जात आहे.

रवींद्र आबा धनगर (28, रा.अक्राळे, पोस्ट रनाळे, ता.नंदुरबार) व समाधान पंडीत कोळी (23) व सागर पंडीत कोळी (26, दोन्ही रा. आरावे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.



संशय आल्यानंतर बिंग फूटले
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे गुन्हे शोध पथक 14 फेब्रुवारी रोजी शहरात सायंकाळचे वेळी पेट्रोलींग करीत असतांना शास्त्री मार्केट परिसरात एक इसम काळया रंगाची होंडा शाईन मोटारसायकल संशयास्पद स्थितीत घेऊन जातांना दिसल्यानंतर संशय आल्याने त्याला विचारणा केल्यानंतर त्याने नाव रवींद्र आबा धनगर (28, रा. अक्राळे, पोस्ट रनाळे, ता.नंदुरबार) सांगितले व वाहनाबाबत कागदपत्रे विचारल्यानंतर ती नसल्याने संशय बळावला व संशयीत उत्तर देत नसल्याने त्याला ताब्यात घेत चौकशी केल्यानंतर त्याच्याविरोधात नंदुरबार शहर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 207/2026 महा. पो. अधि. 1951 चे कलम 124 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात आरोपीने आपले दोन साथीदार समाधान कोळी व सागर कोळी यांच्या माध्यमातून नंदुरबार, धुळे तसेच गुजरात व मध्यप्रदेशातून 18 दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीकडून सहा लाख 40 हजार रुपये किंमतीच्या चोरी केलेल्या 18 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. जप्त दुचाकींबाबत नंदुरबार शहर पोलिसात तीन, दोंडाईचा पोलिसात तीन, जबलपूर व सुरत येथे प्रत्येकी एक गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले तर अन्य दुचाकींबाबत आरटीओ विभागाकडून माहिती मागवण्यात आली असून त्याद्वारे वाहन मालकांचा शोध सुरू करण्यात आला आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई नंदुरबार पोलिस अधीक्षक श्रवण दत्त.एस, अपर पोलिस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक निलेश देसले, गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक छगन चव्हाण, उपनिरीक्षक भुनेश मराठे, हवालदार भटू धनगर, प्रशांत पाटील, पंकज महाले, विनोद जाधव, सुनील वाकडे, कॉन्स्टेबल राहुल पांढारकर, ललित गवळी, राहुल राठोड, विनोद महाजन, प्रवीण वसावे, विशाल मराठे, हरेश कोळी, विध्देश्वर बिरारी, नरेंद्र पाडवी, किरण मोरे, रोहिणी धनगर, निंबा वाघमोडे आदींच्या पथकाने केली.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !