बांबरुडला जुन्या वादातून दाम्पत्याला मारहाण


भडगाव (11 मार्च 2026) : जुन्या भांडणाचा राग मनात धरून दाम्पत्याला बेदम मारहाण झाल्याची घटना भडगाव तालुक्यातील बांबरूड गावात घडली. संशयीतांनी शेतातील 15 पाईप फोडून नुकसान केले. या प्रकरणी भडगाव पोलिसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
मीराबाई ईंदलसिंग परदेशी (35) या शेतात पाणी भरण्यास गेल्या असताना संशयित आरोपी गणेश थानसिंग परदेशी, रमेश थानसिंग परदेशी आणि ईश्वर थानसिंग परदेशी (सर्व रा.बांबरूड) यांनी त्यांच्याशी वाद घातला होता. यापूर्वी भडगाव पोलीस स्टेशनमध्ये चापटा-बुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी संशयित आरोपींविरोधात तक्रार देण्यात आली व याच गोष्टीचा राग आरोपींच्या मनात होता.




सोमवार, 9 मार्च रोजी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास, बांबरूड गावातील फिर्यादीच्या घरासमोर सार्वजनिक जागेवर हा वाद पुन्हा उफाळून आला. गणेश थानसिंग परदेशी, रमेश थानसिंग परदेशी आणि ईश्वर थानसिंग परदेशी (सर्व रा. बांबरूड प्र.भा.) यांनी हातात काठ्या घेऊन फिर्यादीचे पती ईंदलसिंग परदेशी यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी त्यांना पोटावर, पायावर आणि हातावर काठीने बेदम मारहाण करून दुखापत केली.

मारहाण करूनच न थांबता, आरोपींनी फिर्यादीला व त्यांच्या पतीला अश्लील शिवीगाळ करत तुम्हाला जीवे ठार मारून टाकू अशी धमकी दिली. त्यानंतर आरोपींनी शेताच्या सामाईक बांधावर ठेवलेले सुप्रिम कंपनीचे 15 सिंचन पाईप फोडून मोठे आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !