यावल तालुक्यातील अल्पवयीन मुलीला पळवले : तरुणाविरोधात गुन्हा
Minor girl kidnapped from Yaval taluka : Crime against youth यावल (12 मार्च 2026) : यावल तालुक्यातील एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला आमोदा, ता.यावल येथील एका तरुणाने आमिष दाखवून फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
एका गावातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलगी कुटुंबासह आपल्या घरी असताना व ती अल्पवयीन असल्याचे माहित असतांना देखील ऋषिकेश उत्तम भील (रा.आमोदा, ता.यावल) याने काहीतरी आमिष दाखवून फुस लावून तिच्या पालकांच्या कायदेशीर रखवालीतून तिला पळवून नेले.




हा प्रकार कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर दोघांचा त्यांनी सर्वत्र शोध घेतला मात्र दोघे कुठेच मिळून आले नाही. सर्वत्र शोध घेऊनही दोघे कुठेच मिळून न आल्याने यावल पोलिसात पीडित अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणाविरुद्ध अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अर्जुन सोनवणे करीत आहे.