मुंबई निशाण्यावर ! विधानभवनासह चार ठिकाणे मिसाईलने उडवण्याची धमकी


Mumbai on target! Threat to blow up four places including Vidhan Bhavan with missiles मुंबई (12 मार्च 2026) : मुंबईतील विधानभवनासह चार ठिकाणांना मिसाईलने उडवण्याची धमकी मेलद्वारे प्राप्त झाल्यानंतर मुंबईत सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत या लेटर बॉम्बमुळे प्रचंड खळबळ उडाल्याचे विधानभवन परिसरात गुरुवारी सकाळी दिसून आले. दरम्यान, धमकीच्या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ संपूर्ण विधानसभा परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केले. यावेळी सुरुवातील विधानसभा कर्मचार्‍यांना बाहेर रोखण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने आयडी आणि तपासणी केल्यानंतर पोलिसांकडून विधानभवनातील कर्मचार्‍यांना विधानसभेत सोडण्यात आले.

काय म्हणाले सभापती ?
या सगळ्या प्रकरणावर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे म्हणाले की, गुरुवारी सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती. बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी देण्यात आल्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतल्याची माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.





चार ठिकाणे हिटलिस्टवर
सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईतील शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली. गुरुवारी सकाळी 6.57 मिनिटांनी धमकीचा मेल आल्याचे राम शिंदे म्हणाले.

विधिमंडळ, मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला धमकी देणारा मेल खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. धमकी देणार्‍याने मिसाईल आणि बॉम्बने संबंधित ठिकाणं उडवून देण्याचं मेलमध्ये नमूद केलं. सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी मेल आल्यानंतर तत्काळ सुरक्षेच्या गृह विभागाकडून सूचना देण्यात आल्या.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !