भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयाच्या माया राजपूतची महिला बॉक्सिंग विद्यापीठ संघात निवड


Maya Rajput of De.N.Bhole College, Bhusawal, selected in the women’s boxing university team भुसावळ (12 मार्च 2026) : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विभाग आंतर महाविद्यालयीन स्पर्धा जळगाव व आंतर विभागीय बॉक्सिंग महिला स्पर्धा एसपीडीएम महाविद्यालय, शिरपूर येथे झाल्या. या स्पर्धेत दादासो देविदास नामदेव भोळे महाविद्यालयातील बॉक्सिंग खेळाडू माया राजेंद्र राजपूतने (एम.कॉम.प्रथम वर्ष (80 + की ग्र. गटात) प्रथम क्रमांक पटकावला.

राजपूतची अखिल भारतीय आंतर विद्यापीठ बॉक्सिंग स्पर्धा लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी , फगवाडा, पंजाब साठी निवड झाली. ही स्पर्धा 9 मार्च ते 14 मार्च दरम्यान होत आहे.





या यशाबद्दल खेळाडूचा महाविद्यालयात माजी व्यवस्थापन परिषद व सिनेट सदस्य प्राचार्य डॉ.राजू फालक, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.जे.बी.चव्हाण, प्रा.एस.डी.चौधरी व प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या. या खेळाडूस प्रा.डॉ.संजय चौधरी यांनी मार्गदर्शन केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !