मोबाईल हॅक करीत 27 वर्षीय विवाहित शिक्षिकेला विवस्त्र होण्यास भाग पाडले
A 27-year-old married teacher was forced to strip naked after her mobile phone was hacked. बुलढाणा (13 मार्च 2026) : 27 वर्षीय विवाहित शिक्षिकेचा मोबाईल हॅक करीत त्यातील खाजगी डेटा चोरून शिक्षिकेला विवाहित होण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सोनाळा पोलिसांनी ऋषिकेश गिरी (27) नावाच्या आरोपीवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
मोबाईल हॅक करून चोरला खाजगी डेटा
आरोपी ऋषिकेश गिरी याने पीडित शिक्षिकेचा मोबाईल बेकायदेशीरपणे हॅक केला होता. हॅकिंगच्या माध्यमातून त्याने शिक्षिकेचे व्हॉट्सप चॅट्स, ईमेल आणि गॅलरीमधील अत्यंत खाजगी फोटो व व्हिडिओ स्वतःच्या ताब्यात घेतले. यानंतर खरा छळ सुरू झाला. तुझे हे सर्व फोटो आणि व्हिडिओ मी तुझ्या पतीला व नातेवाईकांना पाठवून तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने पीडितेला दिली.




व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्याची सक्ती
बदनामीच्या धाकाने पीडिता मानसिक तणावाखाली असताना, आरोपीने याचा गैरफायदा घेतला. त्याने शिक्षिकेला वारंवार व्हिडिओ कॉल करून विवस्त्र होण्यास भाग पाडले. नराधम ऋषिकेश एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने या व्हिडिओ कॉलचे स्क्रीन रेकॉर्डिंग करून ते पीडितेच्या बहिणीलाही पाठवले. पीडितेने विरोध केला, तेव्हा जर तू माझ्याशी शारीरिक संबंध ठेवले नाहीस तर तुला आणि तुझ्या मुलाला ठार मारीन, अशी जीवघेणी धमकी त्याने दिली.
सततचा छळ आणि मुलाच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेता, पीडित शिक्षिकेने अखेर सोनाळा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तत्काळ कारवाई केली आहे