यावल वनविभागाची कारवाई : अवैधरीत्या जळाऊ लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले
Yawal Forest Department Action : Vehicle Illegally Transporting Firewood Seized यावल (14 मार्च 2026) : वनविभागाने गुरुवारी सकाळी अवैधरीत्या जळाऊ लाकडाची वाहतूक करणारे वाहन पकडले. या कारवाईत सुमारे 1.82 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक पसार असून या प्रकरणी वनविभागात गुन्हा दाखल करून वाहन व लाकूड जप्त करण्यात आले.
काय आहे प्रकरण ?
पिळोदा-भुसावळ रस्त्यावर वनविभागाकडून गुरूवारी गस्त सुरू असताना एका विना क्रमांकाच्या महिंद्रा मॅक्स पिकअप वाहनावर कर्मचार्यांचा संशय आल्याने त्याची तपासणी करीता त्यांनी वाहन थांबवले असता वाहन चालक वाहन सोडून पसार झाला. या वाहनात निम प्रजातीचे जळाऊ लाकूड आढळून आले. एकूण 2.400 घन मीटर निम लाकूड (किंमत दो नहजार 256) आणि वाहन (किंमत एक लाख 80 हजार) रुपये मिळून एक लाख 82 हजार 256 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.




या प्रकरणी वनविभागाने भारतीय वन अधिनियम 1927 आणि महाराष्ट्र वन नियमावली 2014 च्या विविध कलमान्वये गुन्हा (क्र. 01/2026) दाखल केला. तपास वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.