जळगावात मनसेच्या सदस्य नोंदणी अभियानाचा थाटात शुभारंभ
अॅड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या उपस्थितीत पदाधिकारी अन् कार्यकर्त्यांचा उत्साह
MNS Membership Registration Drive Grandly Launched in Jalgaon जळगाव (14 मार्च 2026) : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जळगाव शहरात मनसेच्या वतीने ‘सदस्य नोंदणी अभियाना’चा अत्यंत धुमधडाक्यात प्रारंभ करण्यात आला. पक्षाचे ज्येष्ठ नेते अॅड.जयप्रकाश बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
काव्य रत्नावली चौकात गर्दी
शहरातील मानाच्या समजल्या जाणार्या काव्य रत्नावली चौकात सायंकाळी पाच वाजता या अभियानाला सुरुवात झाली. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकार्यांनी मोठी गर्दी केली होती. ‘जय महाराष्ट्र’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. अॅड.बाविस्कर यांनी स्वतः उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत नोंदणी प्रक्रियेची पाहणी केली.




या नोंदणी मोहिमेत मनसेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, अंगीकृत संघटनांचे प्रतिनिधी, विद्यार्थी सेना, महिला सेना तसेच विभाग आणि शाखा अध्यक्षांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. येणार्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी ही मोहिम अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
डिजिटल आणि प्रत्यक्ष नोंदणीवर भर
नोंदणीसाठी येणार्या प्रत्येकाने सोबत पासपोर्ट साईज फोटो आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार, अनेक नवीन युवकांनी आणि महिलांनी उत्साहाने मनसेचे सदस्यत्व स्वीकारले. ड. बाविस्कर यांनी यावेळी बोलताना सांगितले की, राजसाहेबांचे विचार तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि जळगाव शहराच्या प्रश्नांवर सक्षमपणे लढण्यासाठी ही सदस्य नोंदणी मैलाचा दगड ठरेल.
यशस्वीतेसाठी यांचे परिश्रम
यशस्वीतेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर कार्यकारिणीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष अॅड.जमील देशपांडे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, जळगाव महानगराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळेले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम विभाग अध्यक्ष उमेश आठरे, विशाल जाधव,राहुल चव्हाण,दीपक राठोड. खुशाल ठाकूर. असुतोष जाधव, प्रदीप पाटील. विकास पाथरे, जितेंद्र पाटील. रज्जाक सय्यद, शाखाध्यक्ष युसूफ खाटीक, बादशाह शाह, पवन साफकळे व मनसैनिकांनी परिश्रम घेतले.