पुणे विभागात डीसीएन कार्यासाठी विशेष ब्लॉक ; झेलमसह पुणे एक्सप्रेस हडपसरपर्यंतच धावणार !

पुणे यार्ड व पुणे-दौंड सेक्शनमधील कामामुळे 11 ते 13 सप्टेंबरदरम्यान रेल्वे वाहतुकीत बदल


भुसावळ (गुरुवार, 10 सप्टेंबर 2026) : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे यार्ड तसेच पुणे-दौंड सेक्शनमधील विद्यमान लेआउटमध्ये बदल करण्यासाठी डीसीएन कार्य हाती घेण्यात आले आहे. या कामासाठी विशेष देखभाल ब्लॉक घेण्यात आला आहे. त्याचा भुसावळ विभागातून धावणार्‍या काही रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

या गाड्या हडपसर पर्यंतच धावणार
12 सप्टेंबर 2026 रोजी नागपूर येथून सुटणारी गाडी क्रमांक 12136 नागपूर-पुणे एक्सप्रेस ही गाडी पुणे स्थानकाऐवजी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल. 12 सप्टेंबर 2026 रोजी अमरावती येथून सुटणारी गाडी क्रमांक 11406 अमरावती-पुणे ही गाडी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल.

शुक्रवार, 11 सप्टेंबर 2026 रोजी जम्मूतवी येथून सुटणारी गाडी क्रमांक 11078 जम्मूतवी-पुणे एक्सप्रेस ही गाडी हडपसर येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येईल तसेच 13 सप्टेंबर 2026 रोजी पुणे-नागपूर एक्सप्रेस पुणे ऐवजी हडपसरहून सायंकाळी 5.45 वाजता नागपूरकडे रवाना होईल.

प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी
पुणे यार्ड आणि पुणे-दौंड सेक्शनमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा तसेच रेल्वे वाहतुकीची सुरक्षितता आणि देखभालीच्या दृष्टीने हे काम आवश्यक असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी प्रवासापूर्वी आपल्या गाडीच्या वेळा व टर्मिनेशन स्थानकाची माहिती तपासून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या कामामुळे प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगिरी व्यक्त केली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !