चाळीसगावात महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकत एक लाख 20 हजारांची पोत लांबवली
In Chalisgaon, a sack containing ₹1.20 lakh was snatched after chili powder was thrown into a woman’s eyes. चाळीसगाव (14 मार्च 2026) : धूम स्टाईल येत महिलेच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून भामट्याने महिलेच्या गळ्यातील एक लाख 20 हजार रुपये किंमतीची सोन्याची लांबवल्याची चाळीसगावच्या राखुंडे नगर भागात घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय आहे प्रकरण ?
प्राजक्ता प्रतीक पाटील (26, रा.राखुंडे नगर, मालेगाव रोड, चाळीसगाव) या शुक्रवार, 13 मार्च 2026 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास आपल्या घरासमोर उभ्या असताना अज्ञात मोटारसायकल स्वाराने अचानक प्राजक्ता यांच्या जवळ येऊन त्यांच्या तोंडावर मिरचीची पूड फेकली. काही समजण्याच्या आतच चोरट्याने त्यांच्या गळ्यावर थाप मारून चोरट्याने एक लाख 20 हजार रुपये किंमतीची साधारण 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत (मिनी माळ) हिसकावून धूम स्टाईल पळ काढला.




या घटनेबाबत महिलेच्या तक्रारीवरून चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश माळी तपास करीत आहेत. भर दिवसा झालेल्या चोरीने महिलावर्गात घबराट पसरली आहे.