विवाहितेचे अश्लील व्हिडिओ काढल्याने तरुणाचा खून : पाचोरा तालुक्यातील दाम्पत्याला अटक


Man Murdered for Filming Obscene Videos of Married Woman: Couple from Pachora Taluka Arrested पाचोरा (14 मार्च 2026) : विवाहितेशी झालेल्या ओळखीनंतर तिचे अश्लील व्हिडिओ काढल्याच्या वादातून पाचोरा तालुक्यातील तरुणाचा खून करण्यात आला. पिंपळगाव हरेश्वर पोलिसांनी बेपत्ता तरुणाचे मृत्यूचे गुढ उकलत आरोपी दाम्पत्याला बेड्या ठोकल्या आहेत. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. विजय भीमा राठोड (26) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.

बेपत्ता तरुणाचा अखेर खून
संजय भीमा राठोड (33, रा.वरसाडे तांडा नं. 3, ता. पाचोरा) यांचा भाऊ विजय राठोड हा 24 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 11.30 वाजेच्या सुमारास घरातून कोणालाही काही न सांगता बाहेर पडला व 25 पर्यंत तो घरी न आल्याने 26 फेब्रुवारी 2026 रोजी पिंपळगाव हरेश्वर पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली.





तांत्रिक माहितीत संबंध उघड
तपासादरम्यान पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केल्यानंतर विवाहिता सोनाली संजय जाधव यांच्याशी विजय राठोड यांची ओळख असल्याची बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केल्यानंतर विवाहितेचा पती संजय परशुराम जाधव याला चौकशीकामी 13 रोजी ताब्यात घेण्यात आले पोलिस चौकशीत अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.

व्हिडिओच्या माध्यमातून दबाव आणल्याने खून
विजय राठोड याने सोनाली जाधवचे मोबाईलवर अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले व ही बाब पती संजय जाधवच्या लक्षात आल्यानंतर संजय जाधवने पत्नीच्या मदतीने विजय राठोडचा खून केल्याचे उघड झाले. गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची माहितीही तपासात समोर आली. पोलिसांनी संजय परशुराम जाधव आणि सोनाली संजय जाधव या दोघांना अटक केली.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
हा गुन्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक  कविता नेरकर, पाचोरा उपविभागीय पोलीस अधिकारी बापू रोहोम यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय कल्याणी वर्मा, उपनिरीक्षक विठ्ठल पवार, हवालदार किरण ब्राम्हणे, अतुल पवार, अभिजीत निकम, राहुल बेहरे, पांडुरंग गोरबंजार, अमोल पाटील, नामदेव इंगळे, भारत पाटील, दीपक अहिरे, सागर पाटील आदींनी उघडकीस आणला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !