जळगावात 31 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देत अत्याचार : दोघांविरोधात गुन्हा
31-Year-Old Woman Drugged and Raped in Jalgaon; Case Registered Against Two Individuals जळगाव (15 मार्च 2026) : जळगावातील 31 वर्षीय महिलेला गुंगीचे पेय देऊन तिच्यावर दोघांनी आळीपाळीने अत्याचार केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली.
काय घडले जळगावात ?
पीडित महिला ही जळगाव शहरातील एका भागातील रहिवासी असून शुक्रवार, 13 मार्चच्या रात्री 11.30 ते 14 मार्चच्या पहाटे 2 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. पीडितेचे नातेवाईक असलेल्या दोन आरोपींनी तिला एका भागातील घरात गाठले. यावेळी आरोपी राजेश शिवराम पवार याने पीडितेला गुंगीचे पेय पाजले. त्यानंतर शुद्ध हरपलेल्या अवस्थेत असताना राजेश पवार आणि आरोपी राजेंद्र शंकरसिंह पवार या दोघांनी पीडितेच्या संमतीशिवाय तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.




पीडितेने अत्याचाराविरोधात स्वतः फिर्याद दिली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असताना एपीआय माधुरी बोरसे यांनी वैद्यकीय अधिकार्यांच्या उपस्थितीत पीडितेचा जबाब नोंदवून घेतला. त्यानंतर एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
आरोपी राजेश शिवराम पवार याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश वाघ करीत आहेत.