खिरोदा-किनगाव रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुण ठार
Youth killed in collision with unknown vehicle on Khiroda-Kingaon road यावल (17 मार्च 2026) : खिरोदा ते किनगाव जाणार्या रस्त्यावर 19 वर्षीय तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तरुण गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता नाशिक येथील खाजगी रुग्णाला दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण
खिरोदा-किनगाव या रस्त्यावर दुचाकीद्वारे कुशल सुरेश इंगळे (19) हा तरुण जात असताना कोणीतरी अज्ञात वाहनाने समोरून धडक दिली. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचाराकरिता प्रारंभी स्थानिक व नंतर नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील पाटील करीत आहे.

