चाळीसगावात गावठी कट्ट्यातून गोळी सुटल्याने तरुण जखमी : पाच जणांविरोधात गुन्हा
Youth Injured After Bullet Fired from Improvised Pistol in Chalisgaon ; Case Registered Against Five Individuals चाळीसगाव (18 मार्च 2026) : शहरातील हनुमानवाडी परिसरात गावठी कट्ट्यातून झालेल्या गोळीबारात एक तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार, 17 मार्च रोजी दुपारी घडली. या प्रकरणी पाच संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
काय घडले चाळीसगावात ?
चाळीसगावातील हनुमानवाडीतील एका पत्र्याच्या शेडमध्ये अंकित महेंद्र मोरे, मेहुल रत्नपाल मोरे, कृष्णा जिभाऊ झाल्टे आणि इतर दोन अज्ञात व्यक्ती एकत्र जमले असतानाच तरुणांकडे दोन गावठी कट्टे (बेकायदेशीर शस्त्रे) होती. हे तरुण एकमेकांना कट्टा दाखवत असताना, त्यातील एका अज्ञात व्यक्तीने कट्टा सिकंदर शेख निसार शेख यांच्या दिशेने रोखला व अचानक खटका दबल्याने कट्ट्यातून गोळी सुटल्याने सिकंदर शेख यांच्या खांद्यात घुसली. गोळी लागताच सिकंदर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


पोलीस अधिकार्यांची धाव
अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर-पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड, प्रभारी पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी धाव घेतली. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश पंडित माळी करत आहेत.