जळगाव गुन्हे शाखेची कामगिरी : नशिराबादमधील अट्टल दुचाकी चोरटा 10 दुचाकींसह जाळ्यात
Jalgaon Crime Branch Achievement: Notorious Two-Wheeler Thief from Nashirabad Nabbed with 10 Vehicles जळगाव (18 मार्च 2026) : नशिराबाद शहरातील अट्टल दुचाकी चोरट्याला जळगाव गुन्हे शाखेने अटक करीत त्याच्याकडून तीन लाख 10 हजार रुपये किंमतीच्या एकूण 10 दुचाकी जप्त केल्या. समीर शेख शफीक शेख (20, ताज नगर, नशिराबाद) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
समांतर तपासात कारवाई
7 फेब्रुवारी 2026 रोजी जळगाव शहरातील भानू हॉटेल परिसरातून कल्पेश ज्ञानेश्वर चौधरी यांची ‘हिरो स्प्लेंडर’ (एम.एच.19 बी.वाय.7413) चोरीला गेली होती. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर समांतर तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना नशिराबाद येथील ताज नगरातील रहिवासी समीर शेख शफीक शेख (20) हा चोरीच्या दुचाकी बाळगून असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आल्यानंतर आरोपीने जळगाव शहर, एमआयडीसी, जिल्हापेठ आणि चक्क मध्य प्रदेशातील बर्हाणपूर येथूनही दुचाकी चोरल्याची कबुली दिली. आरोपीला शनिपेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.


यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, एपीआय शरद बागल, अंमलदार अतुल वंजारी, विजय पाटील, अक्रम शेख, नितीन बाविस्कर, किशोर पाटील, रवींद्र कापडणे, राहुल रगडे, छगन तायडे, अजय पाटील आणि प्रवीण हिवराळे आदींच्या पथकाने केली.