30 वर्षीय विवाहितेचा पाठलाग करीत विनयभंग


30-Year-Old Married Woman Molested After Being Stalked जामनेर (20 मार्च 2026) : 30 वर्षीय विवाहितेचा पाठलाग करून तिला अश्लील इशारे करीत घुसून माझ्याशी संबंध ठेव नाहीतर तुला व तुझ्या पतीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देऊन विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
जामनेर तालुक्यातील एका गावात 30 वर्षीय विवाहिता आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. पीडीत महिला 13 मार्च रोजी सकाळी गावातून पायी जात असतांना संशयित आरोपी अनिल पांडूरंग पाटील याने पीडीतेकडे पाहून अश्लिल इशारे केले. एवढ्यावरच न थांबता, 16 मार्च रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास जेव्हा पीडिता घरात एकटी असताना आरोपीने घरात प्रवेश करत विवाहितेचा विनयभंग केला तसेच तिच्या पतीला जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडीत विवाहितेने जामनेर पोलिसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी अनिल पांडुरंग पाटील विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.


 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !