चोपडा पोलिसांनी दरोड्याचा डाव उधळला : गावठी पिस्टलासह अहिल्यानगरातील गुन्हेगारांची टोळी जाळ्यात


Chopda Police Foil Robbery Plot : Gang of Criminals from Ahilyanagar Nabbed with Country-made Pistol चोपडा (20 मार्च 2026) : चोपडा शहर पोलिसांनी दरोड्याचा कट उधळत अहिल्यानगरातील सराईत पाच गुन्हेगारांच्या टोळीला चुंचाळे शिवार परिसरातून अटक केली. आरोपींकडून गावठी कट्टा, जिवंत काडतूस आणि दरोड्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी एकूण 11 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
चोपडा ते चुंचाळे रोडवरील सद्गुरू लॉन्सच्या मागे गुरूवार, 19 मार्च रोजी रात्री 8.20 वाजेच्या सुमारास काही संशयास्पद हालचाली होत असल्याची माहिती चोपडा पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस कर्मचारी कारवाई करण्यासाठी गेल्यानंतर आरोपी अंगद कैलास जाधव (21, रा.अहिल्यानगर), रवींद्र भीमा गायकवाड (32, रा.पाथर्डी, अहिल्यानगर), विशाल संदीप पुंडे (20, रा.पुणतांबा, अहिल्यानगर), डिगंबर बारकु पवार (33, रा.पाथर्डी, अहिल्यानगर), हरीदास पंढरीनाथ शिरसाठ (40, रा.पाथर्डी, अहिल्यानगर) यांच्यासह दोधे कार (एम.एच. 16 सी.सी. 1753) दरोडा टाकण्याच्या पूर्वतयारीने एकत्र जमल्याने संशय आल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले.


झडतीत दरोड्याचे साहित्य जप्त
पोलिसांनी केलेल्या झडतीत आरोपी अंगद कैलास जाधव याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल (कट्टा) आणि जिवंत काडतूस मिळून आले. याशिवाय कारच्या डिक्कीतून पांढरी रशी, मिरची पूड, टॉर्च, स्क्रूड्रायव्हर आणि एक धारदार चाकू जप्त करण्यात आला आहे तसेच पाच महागडे मोबाईल फोन आणि 10 लाख रुपये किंमतीची अर्टिगा कार असा एकूण 11.10 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. पाजी’ नावाने ओळखला जाणारा एक आरोपी आणि त्याचा एक साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले. पोलीस कर्मचारी अमोल पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक चेतन कैलास परदेशी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !