रावेरात नगरसेवकाकडे धाडसी चोरी : 11 तोळे सोन्यांसह दहा लाखांची रोकड लांबवली


Audacious Burglary at Councilor’s Residence in Raver: 11 Tolas of Gold and ₹10 Lakhs in Cash Stolen रावेर (20 मार्च 2026) : रावेरातील एका नगरसेवकाकडे घाडसी घरफोडी झाली असून चोरट्यांनी 11 तोळे सोने, 250 भार चांदी आणि 10 लाख रुपयांची रोकड आदी ऐवज लांबवल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

मध्यरात्रीच्या सुमारास चोरी
पोलीस स्टेशनपासून अवघ्या काही अंतरावर नगरसेवक दिलीप हिरामण पाटील कुटुंबासह वास्तव्यास आहेत. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे लोखंडी गज कापून आत प्रवेश केला. घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने, ज्यात सोन्याची पोत, अंगठ्या, चपला हार अशा सुमारे 11 तोळे वजनाच्या दागिन्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला तसेच 250 भार वजनाचे चांदीचे तोडे देखील चोरून नेले.


दिलीप पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी नुकतेच त्यांचे गट क्रमांक 776/1 हे शेत विकले होते. या व्यवहाराचे आलेले 10 लाख रुपये घरातच ठेवले होते. चोरट्यांनी दागिन्यांसोबतच ही मोठी रोकडही लंपास केली. एकूण चोरीला गेलेल्या मालाची किंमत पाहता हा आकडा साडे अठरा लाखांच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

पोलीस तपासाची चक्रे फिरली
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल बडगुजर आणि पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांनी सहकार्‍यांसह तातडीने घटनास्थळी भेट दिली. चोरीचे गांभीर्य लक्षात घेता जळगाव येथून ठसे तज्ज्ञ आणि श्वान पथकाला पाचारण करण्यात आले आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !