‘कफ सिरपमध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा भोंदूबाबा : अंजली दमानियांचा खळबळजनक आरोप
‘Fraud Baba’ Used to Crush and Mix Viagra into Cough Syrup: Anjali Damania’s Sensational Allegation मुंबई (20 मार्च 2026) : नाशिकमधील महिला अत्याचार प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदूबाबावर गंभीर आरोप केला आहे. आरोपी अशोक खरात हा ‘व्हायग्रा’ मिश्रित एक विशेष ‘जल’ तयार करत असे आणि ते मिळवण्यासाठी अनेक बड्या राजकीय व्यक्तींची त्याच्याकडे रांग लागायची, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
काय म्हणाल्या दमानिया ?
अंजली दमानिया म्हणाल्या, अशोक खरात हा एक ओशनो जल बनवायचा. एका कफ सिरपमध्ये पाणी टाकायचा आणि त्यामध्ये कुटून कुटून व्हायग्रा टाकायचा आणि हे ओशने जल बनवायचा. हे ओशने जल घेण्यासाठी अनेक राजकारणी त्यांच्या गाड्या आणि हेलिकॉप्टर पाठवायचे त्यामध्ये एक व्यक्ती तर तिरूपति बालाजी मंदिराचा ट्रस्टी आहे, असा आरोप दमानिया यांनी केला आहे.

हा तर महाराष्ट्राची एपस्टीन फाईल
अंजली दमानिया यांनी अशोक खरात प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेत याला ‘महाराष्ट्राची एपस्टीन फाईल’ असे संबोधले असून, सर्वपक्षीय नेते त्याच्याकडून सल्ला आणि ‘ओशनो जल’ मागवत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे.
शेकडो महिलांच्या लैंगिक शोषणाचे हे प्रकरण अत्यंत गंभीर असल्याचे सांगतानाच, दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांचा एक जुना व्हिडिओ समोर आणला आहे, ज्यामध्ये त्यांनी खरातची तुलना थेट पांडुरंगाशी केली होती. या पार्श्वभूमीवर, चाकणकर यांचा राजीनामा का घेतला जात नाही आणि त्यांना कोणाचे संरक्षण लाभत आहे, असा संतप्त सवाल विचारत दमानिया यांनी सरकारला धारेवर धरले आहे.
