नाशिकच्या भोंदू खरातला राजाश्रय ! ; संपर्कात आलेल्यांचे सीडीआर तपासा : विजय वडेट्टीवार


State Patronage for Nashik’s Charlatan Kharat! — “Investigate the CDRs of Those Who Came in Contact with Him”: Vijay Wadettiwar मुंबई (21 मार्च 2026) : नाशिकचा भोंदूबाबा खरातला राजाश्रय असून मोठ-मोठ्या नेत्यांसोबत फोटो समोर आले आहेत. मी कोणाचा उल्लेख करणार नाही पण व्हिडिओ जे व्हायरल होत आहे ते पाहून लाज वाटली पाहिजे असे आहेत. सरकारला खरातांना वाचवणे गरजेचे वाटते आहे, नाहीतर ज्यांनी हे प्रकरण काढले त्यांना अटक करण्याची काय गरज होती, असा सवाल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. खरातच्या संपर्कात आलेल्या सर्वांचे सीडीआर तपासावेतव त्या मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत, असेही वडेट्टीवार यांनी सांगत अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचे सांगितले.

‘त्या’ मंत्र्यांचे राजीनामे घ्यावेत
विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर ज्या पदावर काम करत होत्या त्या पदावर राहून असे अशोभनीय काम केले. चाकणकरांनी भोंदू बाबाच्या चक्करमध्ये मानसिक गुलामी पत्कारल्याने त्या महाराष्ट्रातील महिलांना न्याय देऊच शकत नव्हत्या. ज्यांचा विश्वास भोंदूगिरी, ज्योतिष्य यावर आहे, त्यांच्याकडून महिलांना न्याय कसा मिळणार? त्यांचा राजीनामा झाला पण खरातांसोबत असलेले नवरत्न जे आहेत त्यांचे फोटो समोर येत आहे. खरातची अफाट संपत्ती असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाचा सीडीआर तपासला पाहिजे. त्याने काय-काय संवाद साधला, काय कृत्य केले. सत्तेतील अनेक मंत्र्यांनी कोणते कोणते कृत्य केले, हे महाराष्ट्राला समजले पाहिजे. त्या सुद्धा मंत्र्यांचे राजीनामे घेतले गेले पाहिजे.


खरात प्रकरण सरकारला दाबायचंय
विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर यांचे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी समर्थन केले आहे. तो त्यांचा निर्णय असतो. भरणे यांनी त्यांची बाजू घेतली तेव्हा त्यांना किती ट्रोल करण्यात आले हे सर्व महाराष्ट्राने पाहिले आहे. अंधश्रद्धेतून हे जे वागले त्यातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्र सरकारची नाचक्की झाली आहे. हे प्रकरण ज्यांनी काढले काल त्यांनाच अटक करण्यात आली आहे म्हणजे खरात प्रकरण सरकारला दाबायचे आहे. या प्रकरणी पोलिसांवर प्रचंड दबाव आहे. जे मोठे मासे खरातांच्या जाळ्यात अडकले आहेत त्यांना वाचवण्यासाठी हे प्रकरण दाबण्यात येऊ शकते.

अधिवेशनात आवाज उठवणार
विजय वडेट्टीवार म्हणाले की, रुपाली चाकणकर यांनी का राजीनामा दिला हे सर्वांना माहिती आहे. यामध्ये पुढचे टार्गेट कोण याबद्दल आमच्याकडे सर्व माहिती आहे. सोमवारी अधिवेशनामध्ये या प्रकरणी आम्ही आवाज उठवणार आहोत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !