मोबाईल टॉवरमधील डिझेलची चोरी : अकोल्यातील चोरट्याला पोलिसांकडून बेड्या
Robo de diésel de una torre de telefonía móvil: la policía arresta a un ladrón en Akola. भुसावळ (21 मार्च 2026) : अकोल्यातील चोरट्याला डिझेल चोरी प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. श्याम सुभाष कुकडे (वय 38, मूळ रा.राणेगाव, जि.अकोला, सध्या रा.पिंप्राळा, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत चोरटा असून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. आरोपीकडून 170 लिटर चोरीचे डिझेल जप्त करण्यात आले.
काय आहे प्रकरण
तरसोद गावातील आसोदा रोडवर असलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरवर 16 फेब्रुवारी 2026 रोजी मध्यरात्री चोरी झाली. चोरट्याने जनरेटरचे नुकसान करून त्यातील 15 हजार 934 रुपये किंमतीचे सुमारे 170 लिटर डिझेल चोरी केले. कंपनीचे सुपरवायझर विजय नगराज पाटील (वय 49, रा. आशाबाबा नगर, जळगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल होता. सहाय्यक फौजदार राजेश मेंढे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीद्वारे श्याम सुभाष कुकडे (वय 38, मूळ रा. राणेगाव, जि. अकोला, सध्या रा. पिंप्राळा, जळगाव) याला अटक केली.

यांनी केली कारवाई
पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक योगीता नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार राजेश मेंढे, हवालदार कमलाकर बागुल, भूषण पाटील आणि प्रवीण लोहार यांनी कारवाई केली.
