दागिणे बनवण्याच्या बहाण्याने कारागीराने 45 लाखांची सोने लांबवले


A craftsman made off with gold worth ₹45 lakhs under the pretext of making jewelry. मुंबई (21 मार्च 2026) : मुंबईतील कुर्ला परिसरातील कारागीराने दागिने घडवण्याच्या बहाण्याने 45 लाखांचे सोने घेऊन पळ काढला. ही घटना कुर्ला परिसरात घडली. याप्रकरणी कुर्ला पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

काय आहे प्रकरण ?
प्रवीण मटकर (52) हे कुर्ल्यातील सुभाषनगर येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मालकीच्या खोलीत भाड्याने राहणारा सोने कारागीर सुकेंदू रणजीत सामंता व त्याची पत्नी मधुमिता सामंता हे गेली 18-20 वर्षे ओळखीचे असल्याने विश्वासाने मटकर यांनी 13 ऑगस्ट 2025 रोजी आईचे जुने दागिने वितळवून तयार केलेली 200 ग्रॅम सोन्याची लगड, 20 ग्रॅम सोन्याचा तुकडा असे एकूण 220 ग्रॅम सोने नवीन दागिने बनविण्यासाठी दिले होते.


अनेकांच्या दागिन्यांचा अपहार केल्याचा संशय
तक्रारदार मटकर यांनी पश्चिम बंगालमधील आरोपीच्या मूळ गावी जाऊन चौकशी केल्यानंतर त्यांना केवळ 59.540 ग्रॅम सोन्याची लगड परत देण्यात आली मात्र उर्वरित सुमारे 160.46 ग्रॅम सोने परत देण्यास नकार देण्यात आला. याशिवाय, इतर तक्रारदारांमध्ये शांतीलाल जैन (70 ग्रॅम), नरेश जैन (108.83 ग्रॅम) आणि वैशाली सोनी (118 ग्रॅम) यांचेही सोने आरोपीने अपहार केला. एकूण सुमारे 45.70 लाख रुपयांच्या सोन्याचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !