यावल शहरात रमजान ईद उत्साहात
Ramjan Eid Celebrated with Enthusiasm in Yawal City यावल (22 मार्च 2026) : यावल शहरातील चोपडा रस्त्यावरील अक्सा नगरातील इदगाह मैदानावर शनिवारी सकाळी 9 वाजेला पवित्र रमजान ईदची सामूहिक नमाज अदा करण्यात आली. सकाळ पासूनच इदगाह मैदानावर नमाज अदा करण्याकरीता मुस्लिम समाज बांधवांनी गर्दी केली. देशात एकात्मता,अखंडता, शांतता व बळीराजाला सुगीचे दिवस येवो, अशी सामूहिक दुवा पठण करीत मुस्लिम समाज बांधवांनी इदची नमाज अदा केली. लोकप्रतिनिधींसह सर्वधर्मिय बांधवांनी येथे उपस्थिती देवुन मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सामूहिकरित्या नमाज पठण
शहरात चोपडा रोडावर अक्सा नगर आहे. या अक्सा नगरात इदगाह मैदान आहे.या मैदानावर दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मुस्लिम समाज बांधवांनी शनीवारी सकाळी 9 वाजेला पवित्र रमजान ईद की नमाज सामूहिकरीत्या पठण केली. पवित्र रमजान अर्थात ईद-उल-फित्र ची नमाज पारंपारिक पध्दतीने मौलाना अब्दुल नबी हजरत यांच्या कुटुंबातील मौलाना शमीम बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली मौलाना हजरत अब्दुल हाफीस कादरी यांच्या मागे सामूहिकरित्या पठण करण्यात आली. ईस्लाम धर्मातील पाच मूळ तत्वापैक्की एक म्हणून रमजान महिना ओळखला जातो.

प्रत्येक मुस्लीम धर्मातील समाज बांधवास ही पाच मुळ तत्वे पाळवीच लागतात, असा अल्लाहने दिलेला आदेश आहे, असं म्हटले जाते. दरम्यान रमजानच्या पवित्र महीन्यात रोजा करणे हा प्रार्थना करण्याचा व अल्लाह जवळ जाण्यासाठीचा एक मार्ग असल्याची मुस्लीम बांधव मानतात आणि स्वयंशिस्त उत्तम राहण्यासाठी रोजा करणं चांगले असल्याचे म्हटंले जाते.
यावल शहरात शुक्रवारी चंद्रदर्शनानंतर ईदच्या विविध खरेदी साठी मुस्लीम बांधवांनी प्रमुख बाजार पेठेत एकच गर्दी केली होती. शनिवार, 21 मार्च रोजी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लीम समाज बांधवांनी नववस्त्र परिधान करून तसेेच शहरातील विविध मशीदीत ईमाम यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज पठण केली.
नमाज अदा केल्यानंतर मुस्लीम बांधवांना ईदगाह मैदानावर रमजान ईदची शुभेच्छा देण्यासाठी माजी आमदार रमेश चौधरी, एनएसयुआयचे राज्य चिटणीस धनंजय चौधरी, नगरसेवक अतुल पाटील, पोलिस निरिक्षक रंगनाथ धारबळे, नगरसेवक शेख निसार शेख हमीद, हाजी गफ्फार शाह, शिवसेना उबाठा शहरप्रमुख जगदिश कवडीवाले, संतोष खर्चे, पप्पु जोशी सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती.
देशात एकात्मता,अखंडता, शांतता व बळीराजाला सुगीचे दिवस येवो अशी सामुहिक दुवा पढण करीत मुस्लिम समाज बांधवांनी ईद साजरी केली. इदगाह मैदानावर या नमाजचे आयोजन इदगाह कमिटीचे अध्यक्ष शेख हबीब शेख नसीर, उपाध्यक्ष शेख करीम मन्यार, सचिव शेख असलम शेख नबी, रईस खान, हाजी शेख हकीम खाटीक, हाजी युसूफ खान, इमाम सर, हाजी फारूख मोमीन, अंन्सार, एजाज पटेल आदींच्या वतीने करण्यात आले होते.
