साकळीत उद्या मोफत आरोग्य तपासणी शिबिर


यावल (22 मार्च 2026) : यावल तालुक्यातील साकळी गावात मुख्य चौकात मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता सदर शिबिर सुरू होणार असून या शिबिराचा परिसरातील नागरिकांनी व रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

साकळी, ता.यावल येथे सोमवारी ग्रामपंचायतीचे सरपंच दीपक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गोल्डन अवर हॉस्पिटल, भुसावळ यांच्या वतीने डॉ.सांतनूकुमार साहू यांच्या प्रमुख उपस्थितीत मोफत आरोग्य तपासणी शिबिर ठेवण्यात आले आहे. शिबिर हे मुख्य चौकात सकाळी दहा वाजता सुरू होईल व एक वाजेपर्यंत चालणार आहे.


या शिबिरात नागरिकांना आयुष्यमान योजनेचे कार्ड उपलब्ध करून दिले जातील. त्याच प्रमाणे रुग्णांची या ठिकाणी हृदयरोग, संधिवात, सांधेदुखी, मधुमेह, थायरॉईड सह विविध आजाराच्या संदर्भात तपासणी केली जाणार आहे. परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !