ठाकरेंची शिवसेना संतप्त : आयपीएस तुषार दोशींच्या निलंबनाचा अधिकार उपसभापतींना आहे का? नीलम गोर्‍हेंना पदावरून हटवण्याची मागणी


Thackeray’s Shiv Sena Outraged:  Does the Deputy Chairperson Have the Authority to Suspend IPS Officer Tushar Doshi? Demand Raised to Remove Neelam Gorhe from Her Post. मुंबई (23 मार्च 2026) : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून विधिमंडळात राडा झाल्यानतंर ठाकरेंच्या शिवसेनेने एखाद्या आयपीएस अधिकार्‍याच्या निलंबनाचे अधिकार विधान परिषदेच्या उपसभापतींना असतो का ? असा प्रश्न केला आहे.

उपसभापतींच्या आदेशाने खळबळ
सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये राज्याचे मंत्री शंभुराज देसाई आणि मकरंद पाटील यांच्याशी पोलिसांनी झटापट केली. त्यामध्ये शंभुराज देसाई यांच्या हाताला जखम झाली. या घटनेचे पदसाद विधान परिषदेत उमटलं. या प्रकरणात उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी सातार्‍याचे एसपी तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत.


नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडणार
या प्रकरणावरून राज्य सरकारवर टीकेचा आसूड ओढणार्‍या ठाकरेंच्या सेनेकडून आता नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. नीलम गोर्‍हे यांना आयपीएस अधिकार्‍याच्या निलंबनाचे अधिकार आहेत का? असा प्रश्न ठाकरेंच्या सेनेने विचारला.

नीलम गोर्‍हे यांनी अधिकाराचा गैरवापर करत निर्णय दिल्याचं म्हणणं ठाकरेंच्या शिवसेनेचं असून यांना पदावरून दूर करा अशी मागणी करणारे पत्र ठाकरेंच्या शिवसेनेने सभापती राम शिंदे यांच्याकडे दिले आहे. या प्रकरणी, मंगळवारी ठाकरेंच्या सेनेकडून नीलम गोर्‍हे यांच्या विरोधात प्रस्ताव मांडला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !