अशोक खरात प्रकरणात कुणाचीही गय नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
No leniency will be shown in the Ashok Kharat case: Chief Minister Devendra Fadnavis मुंबई (23 मार्च 2026) : नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणात दोषी कुणीही असलातरी त्याची गय केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. विधानसभेत विरोधकांनी अशोक खरात प्रकरणावरून चांगलाच हल्लाबोल केला. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी आपल्या आक्रमक शैलीत या संदर्भातील घटनेवर गांभीर्याने कारवाई करण्याची मागणी सरकारकडे केली.तर दुसरीकडे नाना पटोले यांनी अशोक खरातसोबत ज्यांचे फोटो आहेत, त्या सर्वांचेच राजीनामे घेतले जाण्याची मागणी केली.
काय म्हणाले मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस म्हणाले, तथाकथित काय तांत्रिक, मांत्रिक, बाबा जे काय असतील, भोंदू बाबा अशोक खरात या व्यक्तीच्या संदर्भात टेक काढणं चाललंय आता… जो विषय घडलेला आहे तो अत्यंत गंभीर आहे. या व्यक्तीने आपल्या तथाकथित शक्तींचा दुरुपयोग करून आणि दिशाभूल करून अनेक महिला ज्या आहेत यांच्यासोबत गैरव्यवहार, दुष्कृत्य केल्याचं समोर येतंय.

पोलिसांनी प्रो-क्टिव्हली कारवाई केली
पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात मी सभागृहाला अवगत करू इच्छितो की, या संदर्भातील कारवाई ही आपल्या पोलिसांनी प्रोक्टिव्हली केलेली आहे. याचा ट्रॅप तयार करून ती केलेली आहे. यामध्ये महिला इन्व्हॉल्व्हड असल्यामुळे त्यांची फसवणूकच झाली होती पण त्या समोर यायला तयार नव्हत्या त्यावेळेस त्यांचे योग्य पद्धतीनं त्यांना धीर देऊन आणि अशा पद्धतीनं आता काही महिलांनी तक्रार केली असून उर्वरित अजून काही महिला या संदर्भात तक्रार करतील.
मी केवळ आपल्याला एव्हढंच सांगतो की, या संदर्भात कारवाई जरी आता झाली, तरीदेखील याची तयारी आधीपासून सुरू होती. त्यांच्या अटकेच्या अगोदरच म्हणजे साधारणपणे 10 तारखेला, 10/3 ला दुसर्या जिल्ह्यातून आपण एका कंप्लेंटचा उपयोग करून त्यांचा एलओसी देखील काढून ठेवला होता की त्यांना बाहेर पळता येऊ नये, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
उद्या याचं सविस्तर निवेदन करीन
देवेंद्र फडणवीस म्हणाले, या संदर्भात पूर्णपणे कारवाई आपण करतो आहोत. मी या सभागृहामध्ये उद्या याचं सविस्तर निवेदन करीन कारण आजही चौकशी चाललेली आहे संपूर्ण प्रकरणाची. आणि दोन्ही बाजूला माझी विनंती आहे की, हा आपल्या कोणाकरता राजकारणाचा प्रश्न नाहीये, हा महिलांच्या डिग्निटीचा प्रश्न आहे.




