भुसावळात पोलिसांची मोहिम : हद्दपारसह हिस्ट्रीशीटरांची तपासणी

116 केसेसद्वारे सव्वा लाखांचा दंड वसुल ; कारवाईने गुन्हेगारांचे दणाणले धाबे


Police Operation in Bhusawal: Inspection of Externs and History-Sheeters भुसावळ (24 मार्च 2026) : भुसावळातील गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी पोलिस प्रशासनाने कंबर कसली आहे. कायद्याचा बडगा वापरत गुन्हेगारांविरोधात कारवाई होत असतानाच आता पोलिसांनी रेकॉर्डवरील हिस्ट्रीशीटरची तपासणी करीत विविध वॉरंटची 23 रोजी अंमलबजावणी केली. पोलिसांच्या धडक कारवाईने गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

शहर हद्दीत अशी झाली कारवाई
शहर हद्दीत पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी मोहिम राबवत पाच हिस्ट्रीशीटरची तपासणी करीत दोन हद्दपारांची तपासणी केली मात्र ते शहरात आले नसल्याचे स्पष्ट झाले त्या शिवाय दोन ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हच्या केसेस तसेच मोटार व्हेईकल अ‍ॅक्टच्या 35 केसेस करण्यात आल्या. यावेळी एनबीडल्यूचे तीन वॉरंट बजावण्यात आले व दारुबंदीच्या तीन तर जुगाराची एक केस करण्यात आली.


बाजारपेठ हद्दीत अशी झाली कारवाई
बाजारपेठ हद्दीत निरीक्षक राहुल वाघ यांच्या नेतृत्वात 120 वाहनधारकांची कागदपत्रे तपासल्यानंतर 45 वाहन धारकांकडून 54 हजारांचा दंड वसुल करण्यात आला तसेच बीएनएस 285 प्रमाणे दोन केसेस करण्यात आल्या. ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हची एक, दारुबंदीच्या दोन, जुगाराच्या दोन, 12 समन्सची बजावणी, पाच बेलेबल वॉरंटची बजावणी, नॉन बेलेबल वॉरंट प्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली तसेच आठ हिस्ट्रीशीटरच्या तपासणीसह 12 हॉटेल्स व लॉजची तपासणी करण्यात आली. मुंबई पोलीस अ‍ॅक्ट 122 प्रमाणे एकावर तर प्रोव्हीशनच्या सहा केसेस करण्यात आल्या व 66/192 प्रमाणे एक कारवाई करण्यात आली.

116 केसेसद्वारे सव्वा लाखांचा दंड वसुल
भुसावळ उपविभागात सोमवारी झालेल्या विशेष कारवाईत एकूण 116 केसेसद्वारे एक लाख 26 हजार 100 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेंतर्गत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांपासून ते ड्रंक अँड ड्राईव्ह, दारूबंदी, जुगार, हिस्ट्रीशीटर तपासणी, तडीपार कारवाई, अटक वॉरंट व बेलेबल वॉरंटची अंमलबजावणी तसेच हॉटेल-लॉज तपासणी अशा विविध स्तरांवर एकाच वेळी कारवाई करण्यात आली.

तीन्ही ठाण्यांचे अधिकारी सहभागी
या मोहिमेत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन, बाजारपेठ पोलीस स्टेशन आणि भुसावळ शहर पोलीस स्टेशन यांच्या पथकांनी समन्वयाने सहभाग घेतला. सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रात्रगस्त वाढवून संशयित व्यक्तींची कसून चौकशी करण्यात आली.

यांचा कारवाईत सहभाग
भुसावळ उपअधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक राहुल वाघ, भुसावळ शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक उध्दव डमाळे, नशिराबाद सहाय्यक निरीक्षक योगीता नारखेडे, सहाय्यक निरीक्षक उमेश महाले यांनी कारवाई केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !