खिर्डी खुर्द येथे ईद मिलन कार्यक्रमातून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन
Hindu-Muslim Unity Exemplified at Eid Milan Program in Khirdi Khurd खिर्डी, ता.रावेर (25 मार्च 2026) : खिर्डी खुर्द ता. रावेर येथील केळी, कापूस तसेच धान्य व्यापारी शेख इम्रान शेख कमर, यांच्यासह शेख रईस, शेख फारुक, शेख फरीद, शेख इरफान, शेख मोसिम, शेख आमिन यांच्या वतीने ईद मिलन कार्यक्रमाचे उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात हिंदू-मुस्लिम समुदायातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने सामाजिक सलोखा आणि एकतेचे दर्शन घडून आले.
यांची होती उपस्थिती
या सोहळ्याला जि.प.चे माजी उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, भाजपचे युवा जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, शिवसेनेचे छोटू पाटील, अॅड.संदीप भंगाळे, निंभोरा पोलिस स्टेशनच्या सहायक पोलिस उपनिरीक्षक दीपाली पाटील व त्यांचे सहकारी कर्मचारी, पोलिस पाटील रितेश चौधरी, भास्कर पाटील, खिर्डी खुर्द सरपंच राहुल फालक, सुनील कोल्हे, विनोद पाटील, निळकंठ पाटील, विलास पाटील, हेमंत नेमाडे, दत्तात्रय फालक, राजेंद्र महाजन, हेमंत किरंगे, गोपाल झोपे, किशोर बढे, गुणवंत पाटील, चंद्रकांत कोळी, सतीश फेगडे, जाकिर पिंजारी, अलाताफ बेग, शेख नईम, शेख कय्युम, फारुख शेख, साबीर बेग, जाबीर बेग, अनिस शेख, निसार शेख, रहीम शेख, सुरेश महाजन, सोनू पाटील, अंकित पाटील, धीरज महाजन, हर्षल महाजन, जितेंद्र फालक, भास्कर भंगाळे, प्रवीण भंगाळे, निळकंठ बढे, गिरीश ढाके, संजू किरंगे, दुर्गादास बोंडे, भूषण ढाके, पुर्वेश बढे, गणेश राणे, गणेश देवगिरीकर, नितीन नेहेते, किरण कोळी, सुलतान मण्यार, रवी कोचुरे, कांतिलाल गाढे, भरत लढे, युवराज इंगळे, योगेश कोळंबे, कुंदन झोपे, लोकेश बढे, दत्तात्रय बढे, आकाश चौधरी, शांताराम भंगाळे, यश भंगाळे, केतन भंगाळे, योगेश कोचुरे, संतोष बोरसे, जीवन नेमाडे, जयंत भंगाळे, सादिक शेख, प्रदीप पाटील, गुड्डू भंगाळे, डॉ. सुधीर पाटील, युवराज झांबरे यांच्यासह परिसरातील अनेक ग्रामस्थ उपस्थित होते. या स्नेहमेळाव्यामुळे गावातील बंधुभावाची परंपरा अधिक दृढ झाल्याचे पाहायला मिळाले.





