अमळनेरात घरात महिला एकटी असताना विनयभंग


Molestation of a Woman While She Was Alone at Home in Amalner अमळनेर (25 मार्च 2026) : घरात महिला एकटी असताना संशयीताने अनधिकृतपणे प्रवेश करीत विनयभंग केला तर याबाबत जाब विचारल्यानंतर आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून बेदम मारहाण केली. ही घटना अमळनेर तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी मंगळवार, 24 मार्च रोजी सायंकाळी पाच वाजता मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे मारहाण प्रकरण
सोमवार, 23 मार्च रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास पीडित महिला आपल्या घरात झोपली असताना गावातीलच रहिवासी असलेला अंकुश रामदास भील हा घराच्या मागच्या दरवाजाने चोर-पावलांनी आत घुसला. त्याने झोपेत असलेल्या पीडितेशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. पीडितेला जाग येताच तिने आरडाओरडा केल्याने संशयित आरोपी पसार झाला.


पीडितेने या घटनेची माहिती आरोपीच्या वडिलांना देण्यासाठी त्याच्या घरी धाव घेतली मात्र तिथे गेल्यावर आरोपी अंकुश आणि त्याच्या कुटुंबातील सागर रामदास भील, निलुबाई रामदास भील आणि अनिता अंकुश भील यांनी पीडीत महिलेला शिवीगाळ व मारहाण केली आणि जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी मारवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !