मंत्री नरहरी झिरवाळ ट्रान्सजेंडर सोबतच्या अश्लील व्हिडिओमुळे अडचणीत

शासकीय निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत कॅमेर्‍यात कैदमुळे वाढल्या अडचणी


Minister Narhari Zirwal मुंबई (26 मार्च 2026) : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचा एका ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबतचा अश्लील कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हा प्रकार मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी घडल्याचा प्राथमिक अंदाज असून या व्हिडिओनंतर काँग्रेसने नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.

ट्रान्सजेंडर सोबतचा व्हिडिओ व्हायरल
ट्रान्सजेंडर असलेल्या पवन यादव याच्यासोबत मंत्री झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ समोर आल्याचा दावा केला जात आहे. हा व्हिडिओ पवन यादव याचा भाऊ रवी यादव यांनी सार्वजनिक केल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


पवन यादवविरोधात खंडणीचा गुन्हा
पवन यादव हा ट्रान्सवूमन असून खंडणी गोळा करण्याचा व्यवसाय करत असल्याचा भावाचा आरोप आहे. यासंदर्भात याआधीच पवन यादव यांच्यावर मुंबईतील कुरार पोलिस ठाण्यात दमदाटी व खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याचबरोबर, पवन यादव याच्याशी संबंधित प्रकरणात इतर काही मंत्र्यांची नावे देखील पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात असल्याने या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. नरहरी झिरवाळ यांचा हा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण : हर्षवर्धन सपकाळ
राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होणे ही केवळ एक घटना नसून महाराष्ट्राच्या राजकारणातील नैतिक अध:पतनाचे ज्वलंत उदाहरण असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाधक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. एक जबाबदार लोकप्रतिनिधी, ज्याच्यावर जनतेचा विश्वास आणि करदात्यांच्या पैशांची जबाबदारी आहे, त्याच्याकडून अशा प्रकारचे अश्लील आणि अनैतिक वर्तन होणे अत्यंत संतापजनक आणि निषेधार्ह आहे. हा प्रकार केवळ व्यक्तीगत मर्यादांचा भंग नाही तर सार्वजनिक जीवनातील नैतिकतेलाच काळिमा फासणारा आहे, असेही सपकाळ म्हणाले.

या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्र्यांनी कोणतीही विलंब न लावता नरहरी झिरवाळ यांची मंत्रीपदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

लाच प्रकरणाने वाढवली होती अडचण
मंत्री झिरवाळ यांच्या कार्यालयात लाच प्रकरणाने खळबळ उडाली होती. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राजेंद्र ढेरंगे यांना अटक केली होती. चक्क मंत्रालयात लाचखोरीची ही घटना घडल्यामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ माजली होती. राजेंद्र ढेरंगे यांनी झिरवाळ यांचे स्विय सहाय्यक रामदास गाडे यांच्या सूचनेनुसारच ही लाच घेतल्याचा दावा केला होता. त्यामुळे विरोधकांकडून झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. तर या प्रकरणी आपला संबंध आढळला तर आपण तत्काळ राजीनामा देऊ, अशी भूमिका मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केली होती.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !