व्हायरल व्हिडिओनंतर मंत्री झिरवाळांचा राजीनामा घेणार का ? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
Will Minister Zirwal’s resignation be sought following the viral video? The Chief Minister has given a clear statement. मुंबई (27 मार्च 2026) : राष्ट्रवादीचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या व्हायरल व्हिडिओनंतर टीकेचा सूर उमटत असताना मुख्यमंत्र्यांची या विषयावर प्रतिक्रिया आली आहे. व्हायरल होणारा व्हिडीओ हा दोन तीन व्हिडीओ एकत्रित जोडून तयार केल्याचा दावा झिरवळांनी केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. त्या व्हिडीओची शहानिशा केली जाईल, सत्यता तपासली जाईल आणि मग निर्णय घेऊ, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
झिरवाळांच्या राजीनाम्यासाठी वाढला दबाव
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांचा ट्रान्सजेंडरसोबतचा एक कथित व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यावरून झिरवाळांनी राजीनामा द्यावा, अशी एक मागणी केली जात आहे. राष्ट्रवादीतील एका गटाने तशी मागणी केली तर शिवसनेच्या नेत्यांनीही झिरवळांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुख्यमंत्री म्हणाले ; सत्यता तपासली जाणार
खरात प्रकरणानंतर राज्यातील एका मंत्र्याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याने राजकीय आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यावरुन आता मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिवे असून ते म्हणाले की, नरहरी झिरवाळ यांनी मला फोन करून सांगितलं की, तो व्हिडीओ दोन-चार व्हिडीओ एकत्रीत जोडून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे त्याची चौकशी झाली पाहिजे. त्यावर या विषयी तत्काळ तक्रार दाखल करा, या व्हिडीओची शाहनिशा करण्यात येईल असा आपण सल्ला दिला.
एफडीए विभागातील लाचखोरी प्रकरणामुळे झिरवाळ या आधी अडचणीत आले होते. त्या प्रकरणात नरहरी झिरवाळांचा कोणताही हात नसल्याचं अहवाल प्राप्त झाल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांना क्लीन चिट दिली होती. त्यानंतर नरहरी झिरवाळ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत.
दरम्यान, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या कथित व्हिडीओ प्रकरणी राष्ट्रवादी पक्ष राजीनामा घेणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे. आरोप झाले की लगेच राजीनामा घेणं योग्य नसल्याची वरिष्ठांची भूमिका असल्याची माहिती आहे.




