भुसावळातील कुख्यात हसन अली चोरीच्या तीन दुचाकींसह पोलिसांच्या जाळ्यात
जळगाव गुन्हे शाखा व बाजारपेठ पोलिसांची संयुक्त कारवाई : एक संशयीत पसार
Hasan Ali, a notorious criminal from Bhusawal, lands in police net with three stolen two-wheelers. भुसावळ (7 एप्रिल 2026) : भुसावळातील ईराणी वस्तीतील दोन संशयीतांनी दुचाकींची चोरी करून वाहने शहरात आणल्याची माहिती पोलिस यंत्रणेला मिळाल्यानंतर संयुक्त कारवाईत पथकाने तीन दुचाकी जप्त केल्या. यावेळी संशयीत हसन अली उर्फ आशू नियाज अली इराणी यास यंत्रणेने अटक केली तर साथीदार सलमान अली हुजूर अली इराणी (दोघे रा. इराणी मोहल्ला, भुसावळ) हा मात्र पसार झाला आहे. आरोपींकडून मुक्ताईनगर, चोपडा व अहिल्यानगर पोलिस ठाणे हद्दीतून लांबवलेल्या तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सोमवार, 6 एप्रिल 2026 रोजी शहरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिस यंत्रणेला इराणी मोहल्ला परिसरातील रजा टॉवरजवळ काही संशयास्पद दुचाकी उभ्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने संयुक्तरित्या कारवाई करीत तीन दुचाकी ताब्यात घेतल्या व तपासाअंती या दुचाकी हसन अली व सलमान अली यांनी चोरून आणल्याचे कळाल्यानंतर मोठ्या शिताफीने हसन अली यास पकडण्यात यश आले तर दुसरा संशयीत सलमान अली पसार झाला.


दोन जिल्ह्यातून लांबवल्या दुचाकी
पोलिसांनी वाहनांच्या चेसीस क्रमांकाची खातरजमा केल्यानंतर तीन्ही दुचाकी मुक्ताईनगर, चोपडा आणि अहिल्यानगर (तोफखाना) पोलिस स्टेशनच्या हद्दीतून चोरीला गेल्याचे व याबाबत गुन्हा दाखल असल्याचे स्ष्ट झाले. जप्त करण्यात आलेल्या दुचाकींमध्ये पल्सर 125, बजाज पल्सर एन 160 आणि केटीएम 250 या गाड्यांचा समावेश असून या दुचाकींची एकूण अंदाजे किंमत दोन लाख 10 हजार रुपये आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, उपनिरीक्षक शरद बागुल, ग्रेडेड उपनिरीक्षक रवी नरवाडे, हवालदार गोपाल गव्हाळे, नाईक विकास सातदिवे, कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी, कॉन्स्टेबल राहुल वानखेडे व बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, कॉन्स्टेबल योगेश माळी, कॉन्स्टेबल प्रशांत सोनार, कॉन्स्टेबल भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली.





