शिवसेनेच्या मुलूख मैदानी तोफ सुषमा अंधारे यांची प्रकृती खालावली


मुंंबई (8 एप्रिल 2026) : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मुलूख मैदानी तोफ असलेल्या सुषमा अंधारे यांची प्रकृती बुधवारी अचानक बिघडल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईत तातडीने उपचार
सुषमा अंधारे यांची प्रकृती बुधवारी सकाळी अचानक बिघडताच त्यांना तातडीने मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तिथे त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या निगराणीखाली उपचार सुरू आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. सुषमा अंधारे यांना नेमके काय झाले? हे अद्याप समजले नाही. पण त्यांच्या समर्थकांकडून त्यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना केली जात आहे.


विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला राहणार गैरहजर
उल्लेखनीय बाब म्हणजे सुषमा अंधारे उद्या गुरुवारी विधिमंडळ हक्क समितीच्या बैठकीला हजर राहणार होत्या. पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना आता या बैठकीला हजर राहता येणार नाही. यासंबंधीची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून थेट विधिमंडळ सचिवालयाला पत्राद्वारे कळवण्यात येणार आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !