नाशिकमधील नामांकीत आयटी कंपनीतील तरुणींचे शोषण ; सहा आरोपींना अटक


Exploitation of Young Women at a Renowned IT Company in Nashik; Six Accused Arrested नाशिक (9 एप्रिल 2026) : भोंदू अशोक खरात व नंतर रवींद्र एरंडे याने केलेल्या अत्याचाराचे प्रकरण समोर आल्यानंतर आता नाशिकमध्ये आयटी कंपनीत तरुणींचे शोषण झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

जाळ्यात ओढून ‘ते’ करायचे अत्याचार
आरोपी नोकरीची गरज असलेल्या तरुणींना आपल्या जाळ्यात ओढायचे. यानंतर तिचं आळीपाळीनं लैंगिक शोषण करायचे. या प्रकरणी आता नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात एकूण 9 गुन्हे दाखल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या देखील ठोकल्या आहेत.


आसिफ अन्सारी, शफी शेख, शाहरुख कुरेशी, रझा मेमन, तौसिफ अत्तार अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. सर्वांना बुधवारी कोर्टात हजर केलं असता त्यांना 10 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आता आरोपी पीडित तरुणींना कशा पद्धतीने आपल्या जाळ्यात ओढत होते? याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.

जाळ्यातून टाकायचे प्रभाव
आरोपी नवीन नोकरीसाठी आलेल्या किंवा नुकत्याच कंपनीत जॉईन झालेल्या मुलींना टार्गेट करायचे. आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या मुलींना देखील जाळ्यात ओढून त्यांच्यावर प्रभाव टाकला जायचा. आरोपींकडून पार्टी, विविध आमिषं आणि मानसिक दबाव निर्माण करून नोकरी आमच्यामुळेच मिळाली अशी जाणीव करून देत मुलींवर पकड बसवली जात होती.

यानंतर आरोपी तरुणींचा विनयभंग, अत्याचार आणि बलात्कार करत. आरोपी पीडित तरुणींना कंपनीत सुट्टी टाकायला सांगायचे. फिरायला जायचं सांगून रिसॉर्टवर न्यायचे आणि अत्याचार करायचे. आरोपी एवढ्यावरच थांबायचे नाहीत तर त्यांचे आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ काढून त्यांना ब्लॅकमेल करीत होते. यामध्ये आरोपी आपल्या मित्रांनाही सामील करून घ्यायचे आणि साखळी पद्धतीने तरुणींचं शोषण केलं जात होतं, अशी माहितीही समोर आली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !