दादांचा मोबाईल सापडला मात्र ब्लॅक बॉक्स कुठे ; सुप्रिया सुळेंचे तपास यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह


Dada’s mobile phone has been recovered—but where is the ‘Black Box’? Supriya Sule raises questions regarding the investigative agencies themselves पुणे (11 एप्रिल 2026) : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून संशयकल्लोळ सुरू असतानाच आता खासदार सुप्रिया सुळे यांनी यंत्रणांच्या तपासावर संशय व्यक्त केला आहे. त्या म्हणाल्या की, दादांचा मोबाईल सापडला असून ब्लॅक बॉक्स कुठे आहे? असा प्रश्न त्यांनी केला आहे. 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीजवळ झालेल्या या अपघातानंतर अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरित असल्याचे त्यांनी सांगितले.

काय म्हणाल्या सुप्रिया सुळे ?
सुळे यांनी सांगितले की, दादांचा मोबाईल फोन सापडला, पण ब्लॅक बॉक्सबाबत ठोस माहिती का दिली जात नाही? सुरुवातीला ब्लॅक बॉक्स मिळाला नसल्याचे सांगितले गेले, नंतर तो सापडल्याची माहिती देण्यात आली तर काही काळाने तो जळाल्याची चर्चा पसरली. या सर्व विरोधाभासी माहितीमुळे तपासाची विश्वासार्हता कमी होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

या अपघाताबाबत सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. आमच्या कुटुंबावर दुर्दैवी प्रसंग आला आहे, पण भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पारदर्शक तपास होणे गरजेचे आहे, असे त्या म्हणाल्या. दरम्यान, या प्रकरणात अद्याप महाराष्ट्रात गुन्हा दाखल झाला नसल्यानेही त्यांनी आश्चर्य व्यक्त केले.

याच मु्द्यावर रोहित पवार यांनीही सातत्याने पाठपुरावा केला असून त्यांनी पत्रकार परिषद घेऊन काही पुरावे समोर आणले होते तसेच या प्रकरणी कर्नाटकमध्ये झिरो एफआयआर नोंदवण्यात आला आहे. ब्लॅक बॉक्समधील डेटा परदेशात तपासणीसाठी पाठवावा, अशी मागणीही करण्यात आली होती मात्र अद्याप अधिकृत माहिती समोर न आल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे चित्र आहे.

 









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !