भुसावळातील द वर्ल्ड स्कूलमध्ये महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात
भुसावळ (14 एप्रिल 2026) : भुसावळा शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचालित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये 13 एप्रिल 2026 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस उजाळा देण्यात आला व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस अभिवादन करण्यात आले
शाळेच्या मुख्याध्यापिका पेट्रिशा हॅसेट यांच्याहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी शाळेच्या पर्यवेक्षिका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.



