भुसावळातील 975 लाभार्थींच्या खात्यात आज ‘दिव्यांग निधी’ जमा होणार ! : माजी आमदार संतोष चौधरींची माहिती
भुसावळ (17 एप्रिल 2026) : नगरपालिका फंडातून देण्यात येणारा निधी दिव्यांग निधी शहरातील 975 लाभार्थींच्या खात्यात शुक्रवारी दुपारी तीन वाजेपर्यंत जमा होणार असल्याची माहिती माजी आमदार तथा नगरसेवक संतोष चौधरी यांनी दिली.
ते म्हणाले की, 51 लाख 62 हजारांचा निधी दिव्यांग बांधवांच्या खात्यात दुपारपर्यंत जमा केला जाणार आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला दिव्यांग बांधवांसाठी निधी मिळण्याची मागणी केली जात होती शिवाय या संदर्भात अलीकडेच पालिकेवर या मागणीसाठी मोर्चादेखील काढण्यात आला होता.



