ना हरकरत प्रमाणपत्रासाठी 25 हजारांची लाच ; वनपालासह वनरक्षक एसीबीच्या जाळ्यात


Bribe of ₹25,000 for an NOC; Forest Guard and Forester Caught in ACB Net मुंबई (17 एप्रिल 2026) : ना हरकरत प्रमाणपत्रासाठी 25 हजार रुपयांची लाच मागणार्‍या ठाणे जिल्ह्यातील वनपाल आणि वनसंरक्षकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने लाचखोर हादरले आहेत. विलास सानप व रेखा गायकवाड अशी लाचखोर दोघांची नावे आहेत.

असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराला नवीन पेट्रोलपंप उघडायचा असल्याने वनविभागाकडे ना हरकत प्रमाणपत्राची मागणी करण्यात आल्यानंतर विलास सानप यांनी 50 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली मात्र, लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. तक्रारदार आणि आरोपींमध्ये चर्चेअंती 25 हजारांच्या लाचेची रक्कम ठरवण्यात आली.


बुधवारी लाच देण्यासाठी तक्रारदार वन परिक्षेत्रीय अधिकारी वन परिमंडळ अधिकारी येथे गेले असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी देखील सापळा रचला. वन विभागातील अधिकारी विलास सानप आणि रेखा गायकवाड यांना लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !