जी. श्रीकांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये ; राज्यातील चार अधिकार्यांच्या बदल्या
G. Shrikant Returns to Chhatrapati Sambhajinagar; Four Officers Transferred Across the State मुंबई (17 एप्रिल 2026) : राज्यातील पाच सनदी अधिकार्यांच्या बदल्यानंतर आता नव्याने पुन्हा चार अधिकर्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यात छत्रपती संभाजीनगर विभागाच्या आयुक्तपदी जी. श्रीकांत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बदल्यांमुळे महसूल, सिडको आणि जीएसटी विभागातील प्रशासकीय समीकरणे बदलली आहेत.
या अधिकार्यांच्या झाल्या बदल्या

जी. श्रीकांत (आय.एस. 2009) : विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर
जी श्रीकांत हे सुरुवातीला छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे आयुक्त होते. 15 दिवसांपूर्वीच त्यांची नवी मुंबई येथे ‘जल जीवन मिशन’चे अभियान संचालक म्हणून बदली झाली मात्र जी. श्रीकांत पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये बदली झाली असून त्यांच्याकडे मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली.
जी श्रीकांत हे गेल्या पाच वर्षापासून छत्रपती संभाजीनगर शहरांमध्ये आधी जीएसटी आयुक्त आणि महानगरपालिका आयुक्त, प्रशासक म्हणून कार्य केले आहे. त्यापूर्वी ते मराठवाड्यातील लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राहिलेले आहेत.
जितेंद्र पापळकर (आय.एस. 2010) : सह आयुक्त, जीएसटी, मुंबई
छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जितेंद्र पापळकर यांची बदली आता सह आयुक्त, जीएसटी, मुंबई या पदावर करण्यात आली. गेल्या काही काळापासून संभाजीनगर विभागाच्या विकासासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले होते.
गंगाथरन डी. (आय.एस. 2013) : अभियान संचालक, जल जीवन मिशन
गंगाथरन डी. यांची नियुक्ती अभियान संचालक, जल जीवन मिशन, नवी मुंबई या पदावर करण्यात आली. जी.श्रीकांत यांच्या बदलीनंतर रिक्त झालेल्या या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आता गंगाथरन यांच्याकडे असेल.
जगदीश मिनियार (आय.एस. 2015) : आयुक्त, महिला व बालविकास, पुणे
छत्रपती संभाजीनगर येथील सिडकोचे (नवी शहरे) मुख्य प्रशासक म्हणून कार्यरत असलेले जगदीश मिनियार यांची आता पुणे येथे महिला व बालविकास विभागाच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली.


