अनैतिक संबंधाचा संशय ; वकिलासह पत्नीने सेक्रेटरीला संपवले


Suspicion of Illicit Affair: Wife, Along with Lawyer, Eliminates Secretary पुणे (18 एप्रिल 2026) : सेक्रेटरीशी असलेल्या अनैतिक संबंधाच्या संशयातून कुटूंबात सातत्याने वाद होत असतानाच या वादाचा अंत खुनात झाला. सेक्रेटरी घरी आल्यानंतर दाम्पत्यासह अल्पवयीन मुलीने मारहाण केल्यानंतर सेक्रेटरीचा मृत्यू झाला. पुण्यातील या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. भाजपच्या पुण्यातील विधी शाखेचा अध्यक्ष अ‍ॅड.संजय सावंतला खून केल्याबद्दल अटक करण्यात आली तर त्याची पत्नी आणि अल्पवयीन मुलीलाही खुनात सहभागी असल्याबद्दल अटक करण्यात आली. पूनम दिनेश मून (35) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.

अनैतिक संबंधाचा संशय
पुनम मून या अ‍ॅड.संजय सावंतच्या मुंढवा भागातील कार्यालयात सेक्रेटरी म्हणून कार्यरत होत्या मात्र त्यांचे संजय सावंत यांच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय संजय सावंतची पत्नी स्वाती सावंतला असल्याने त्यातून पूनम मुन हिच्यासोबत त्यांचे वाद होत होते.


दोन दिवसांपूर्वी म्हणजेत गुरुवार, 16 एप्रिल रोजी अ‍ॅड. संजय सावंतच्या कार्यालयात संजय सावंत, त्याची पत्नी स्वाती आणि अल्पवयीन मुलीने पुनम मुन यांना मारहाण सुरू केली. त्यानंतर पुनम यांचे पाय दोरीने बांधून त्यांना बॅटने मारहाण करण्यात आली. त्यामध्ये पुनम मुन यांचा मृत्यू झाला. त्यानंतर पुनम मुन यांचा मृतदेह पोत्यात भरुन ते पोतं ऑफिसमध्येच लपवून ठेवण्यात आले. दुसर्‍या दिवशी त्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या सावंत यांचा विचार होता. पूनम मुन यांचे पती उद्धव मुन यांनी त्यांची पत्नी घरी न आल्याने शोध सुरू केला. दुसर्‍या दिवशी सकाळी ते अ‍ॅड.संजय सावंतच्या कार्यालयात गेले असता त्यांना कार्यालयात पोतं आढळून आलं. ते पोतं त्यांनी उघडून पाहिलं असतां आतमध्ये पुनम मून यांचा मृतदेह आढळून आला.

पोलिसांनी संजय सावंत, स्वाती सावंत आणि त्यांच्या अल्पवयीन मुलीला अटक केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !