भुसावळसह महाराष्ट्राच्या प्रवाशांना मोठा दिलासा : एलटीटी-हटिया, संतरागाछी मार्गावर उन्हाळी सुटीत धावणार्‍या ‘या’ रेल्वे गाड्या


Major Relief for Passengers Across Maharashtra, Including Bhusawal: ‘These’ Special Trains to Run on the LTT-Hatia and Santragachi Routes During the Summer Holidays. भुसावळ (18 एप्रिल 2026) “ उन्हाळी सुट्ट्यामुळे रेल्वे गाड्यांना गर्दी वाढल्याने प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया आणि लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी या मार्गांवर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. या विशेष फेर्‍यांमुळे लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी आरक्षण मिळवणे सुलभ होणार असून भुसावळसह उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना या गाड्यांचा मोठा फायदा होणार आहे.

लोकमान्य टिळक टर्मिनस ते हटिया दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण 18 फेर्‍या धावणार आहे. गाडी 08610 ही गाडी दि.22 एप्रिल ते 17 जूनपर्यंत दर बुधवारी सकाळी 5 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सायंकाळी 6 वाजता हटिया येथे पोहोचेल.तर गाडी 08609 ही गाडी परतीची गाडी दि. 20 एप्रिल ते 15 जून दरम्यान दर सोमवारी दुपारी 4.20 वाजता हटिया येथून सुटून तिसर्‍या दिवशी रात्री 12.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोचेल. या मार्गावर ही गाडी विभागात नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा येथे थांबेल.


लोकमान्य टिळक टर्मिनस ते संतरागाछी दरम्यान साप्ताहिक विशेष गाड्यांच्या एकूण 26 फेर्‍या होतील. गाडी 01001 ही गाडी दि.21 एप्रिल ते 14 जुलै दरम्यान दर मंगळवारी रात्री 8.15 वाजता सुटेल.तिसर्‍या दिवशी पहाटे 5 वाजता संतरागाछीला पोचले.तर 01002 ही गाडी दि.23 एप्रिल ते 16 जुलै या काळात दर गुरुवारी दुपारी 3.50 वाजता संतरागाछीहुन सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. ही गाडी विभागात नाशिक रोड, भुसावळ, अकोला, बडनेरा येथे थांबेल.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !