उमर्टी ऐरणीवर : गावठी कट्टा, पाच काडतूसांसह हिंगोलीतील आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Umarti in the Spotlight: Hingoli Accused, Found with Country-made Pistol and Five Cartridges, Caught in Crime Branch’s Net. जळगाव (20 एप्रिल 2026) : गावठी कट्टा व पाच जिवंत काडतुस बाळगणार्या उमर्टीतील शस्त्र तस्करासह हिंगोलीतील खरेदीदाराला जळगाव गुन्हे शाखेने गोपनीय माहितीद्वारे अटक केल्याने शस्त्र तस्करांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे. राहुल कुवरसिंग पावरा (22, रा.उमर्टी, ता.चोपडा), गणपत प्रभाकर किर्तने (28, रा.असोलाजवळ बाजार, ता.औंढा नागनाथ, जि.हिंगोली) अशी अटकेतील संशयीतांची नावे आहेत.
गोपनीय माहितीवरून कारवाई
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना उमर्टी बाजूकडून कृष्णापूर ते मामलदे मार्गे चोपड्याकडे दोन तरुण मोटारसायकलने गावठी कट्टा नेत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिले. संशयीत काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (एम.एच.19 एस.9450) आल्यानंतर त्यांची झडती घेतल्यानंतर
त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, मोटारसायकल आणि दोन मोबाईल फोन असा एकूण 69 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, पोलीस हवालदार विष्णू बिनवाडे, दीपक माळी, रवींद्र पाटील, विलेश सोनवणे आणि पोलीस अंमलदार रावसाहेब पाटील आदींच्या पथकाने केली.


