जळगाव पोलीस अधीक्षकपदी श्रीकांत धीवरे : डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुणे गुन्हे शाखेच्या अधीक्षकपदी बदली


गणेश वाघ
भुसावळ (20 एप्रिल 2026) : भारतीय पोलीस सेवेतील नऊ अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांच्या सोमवारी गृह विभागाने बदल्या केल्या असून त्यात जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या पोलीस अधीक्षकपदावर धुळ्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॅशिंग तसेच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून धीवरे यांची धुळे जिल्ह्याला ओळख आहे.

राज्यातील नऊ अधीक्षकांच्या बदल्या
शासनाचे सहसचिव सुग्रीव धपाटे यांनी राज्यातील नऊ अधीक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांची पुणे राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी धुळ्याचे डॅशिंग पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


अशा झाल्या बदल्या

सातारा अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

पुणे उपायुक्त निखील पिंगळे यांची सातारा पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

सांगली अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबई राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी बदली करण्यात आली.

कोल्हापूर अधीक्षक योगेश गुप्ता यांची गडचिरोली परीक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षकपदी बदली करण्यात आली.

गडचिरोली पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांची कोल्हापूर अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

पुणे उपायुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिक पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली.

जळगाव जिल्ह्याला लाभले कणखर नेतृत्व
धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची जळगाव अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून अत्यंत शिस्तप्रिय व कणखर अधिकारी म्हणून त्यांची धुळे जिल्ह्याला ओळख आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितपणे जळगाव जिल्ह्यालादेखील होणार आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !