चोपड्यात पूर्व वैमनस्यातून तरुणाचा खून : दोघे आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात
Youth Murdered in Chopda Due to Old Enmity : Two Accused Nabbed by Jalgaon Crime Branch चोपडा (21 एप्रिल 2026) : शहरातील 32 वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली होती. प्रदीप राजेंद्र माळी (32) या तरुणाचा पानटपरी जाळल्याच्या वादातून खून करण्यात आल्यानंतर एका आरोपीला स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतर अन्य दोन आरोपींना
जळगाव गुन्हे शाखेने रेल्वेतून अटक केली आहे.

काय घडले चोपडा शहरात ?
मृत प्रदीप माळी हा हमालीचे काम करत होता. तो रविवारी रात्री 9 वाजेपासून बेपत्ता होता. तपासादरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर रात्री 9 वाजून 3 मिनिटांनी प्रदीप माळी, विजय वैदकर आणि निर्मल बडगुजर हे दुचाकीवरून दगडाने ठेचून जाताना दिसून आल्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करीत सुरूवातीला चेतन सुभाष कानडे (रा.पाटील गढी) याला धानोरा गावाजवळून अटक केली होती तर अन्य दोन आरोपींचा शोध सुरू करण्यात आला होता.
रेल्वेत आवळल्या मुसक्या
दोन्ही आरोपी दादर येथून जळगावकडे रेल्वेने निघाल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने नाशिक येथून जळगावकडे येणार्या रेल्वेत आरोपींचा शोध सुरू केल्यानंतर नाशिक-चाळीसगाव दरम्यान चालत्या रेल्वेतून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. मयत प्रदीप महाजन याने आरोपी विजय भास्कर वैदकर याच्याशी पूर्व वैमनस्यातून वाद घातल्याने खून केल्याची कबुली त्यांनी दिली. विजय भास्कर वैदकर (रा.भाग्योदय नगर, चोपडा) व निर्मल संजय बडगुजर (रा.चिंच चौक, चोपडा) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह उपनिरीक्षक सोपान गोरे, उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे, हवालदार रवींद्र पाटील, दीपक माळी, विलेश सोनवणे, विष्णू बिन्हाडे, सुनील दामोदरे, रावसाहेब पाटील, रिजवान शेख यांच्यासह चोपडा शहर निरीक्षक पवन देसले, पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी आदींनी केली.


