जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पदभार स्वीकारला

शिस्तप्रिय, कणखर अधिकारी ; धुळे जिल्ह्यातील उपक्रमांचे सर्वदूर कौतुक


गणेश वाघ
Jalgaon Superintendent of Police Shrikant Dhivare has assumed charge. भुसावळ (21 एप्रिल 2026) : धुळ्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी डॉ.महेश्वर रेड्डी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत नूतन अधीक्षकांचे स्वागत करण्यात आले.

शिस्तप्रिय मात्र कणखर अधिकारी म्हणून ख्याती
श्रीकांत धीवरे हे पोलीस दलातील कणखर व तितकेच शिस्तप्रिय अधिकारी आहेत. धुळ्यातील अडीच वर्षांच्या सेवेत त्यांनी अत्यंत उल्लेखनीय कार्य केले असून त्यांचा बालस्नेही पुरस्कारानेही गौरव करण्यात आला आहे. जनता व पोलिसांमध्ये नेहमीच चांगला समन्वय राहण्यावर त्यांनी भर दिला आहे. पोलीस दलातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी कायदा मोडताच अनेकांवर निलंबनाची कारवाई करण्यात त्यांनी हयगय केली नसल्याने पोलीस दलात त्यांचा वेगळा दरारा आहे. असे असलेतरी चांगले काम करणार्‍या दुय्यम अधिकार्‍यांच्या अडी-अडचणी समजून त्यांच्या अडचणीत ते सर्वोतोपरी मदतीसाठी सुदैव तत्परही असल्याची अनेक उदाहरणे आहेत.


रस्ते अपघात थांबवण्यासाठी उपक्रम
एसपी धीवरे साहेबांच्या संकल्पनेतून ‘सुरक्षेचे पाऊल’ पुस्तकाचे अलीकडेच धुळ्यात प्रकाशन झाले तसेच शासनाच्या उपक्रमांतर्गत अपघात थांबवण्यासाठी धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उपाययोजनादेखील करण्यात आल्याने अधीक्षकांच्या कार्याचे कौतुकही झाले.

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना धुळे पोलिसांनी दिला होता मदतीचा हात
गतवर्षी सप्टेंबर महिन्यात मराठवाड्यात पावसामुळे हाहाःकार उडाल्यानंतर शेतकर्‍यांवर संकट कोसळले होते. केवळ कायदा-सुव्यवस्था ही जवाबदारी न मानता माणुसकीच्या भावनेतून धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक धीवरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांनी तसेच अधीक्षकांनी आपल्या पगारातील काही भागातून दोन लाखांचा निधी जमवत धुळे दौर्‍यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवला होता. मुख्यमंत्र्यांनी अधीक्षकांच्या या कृतीचे एक्सवर पोस्ट टाकत कौतुकही केले होते.

केवळ गुन्हेगारी रोखली नाही तर गुन्ह्यांपासूनही केले परावृत्त
धुळ्यातील गुन्हेगारीला वेसण लावण्यासाठी ठोस पावले उचलत अनेकांची हद्दपारी, एमपीडीएच्या कारवाया झाल्या तसेच अधीक्षकांनी कलम 25 चा प्रभावी वापर करीत अनेक टोळ्याही जिल्हाबाहेर केल्या. केवळ गुन्हेगारी रोखण्यासाठी नव्हे तर गुन्हेगारीपासून परावृत्त होण्यासाठी धीवरे यांनी उपक्रम राबवले. विविध गुन्ह्यातील बालकांचे आचरण सुधारावे व त्यांनी पुन्हा गुन्हेगारीपासून दूर राहण्यासाठी 50 विधीसंघर्षीत बालकांसाठी प्रबोधन करण्यात आले तर अधिकारी, कर्मचार्‍यांसाठी तसेच त्यांच्या पाल्यांसाठी विविध प्रबोधनपर शिबिरे व उपक्रम राबवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !