धुळ्यातील पदभार सोडताना पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे भावूक ; म्हणाले, मी तर धुळेकरच !


धुळे (21 एप्रिल 2026) :  शिस्तप्रिय व तितकेच कणखर अधिकारी म्हणून ओळख लाभलेल्या धुळ्याचे अधीक्षक श्रीकांत धीवरे यांची जळगाव पोलीस अधीक्षकपदी बदली झाल्यानंतर त्यांनी जळगावात पदभार स्वीकारला मात्र धुळे जिल्ह्यात काम करताना अत्यंत समाधान लाभल्याचे व जिल्हावासीयांनी दिलेल्या प्रेमानंतर अधीक्षक भावूक झाल्याचे दिसून आले.

माध्यमांना संदेश ; अधीक्षक झाले भावूक


पोलीस अधीक्षकांनी पाठवलेला संदेश त्यांच्याच शब्दात-

माझी धुळे जिल्ह्यातून बदलीचे आदेश प्राप्त झाले आहेत. या पदाचा कार्यभार सोडताना मला अत्यंत समाधान वाटत आहे. माझा धुळे जिल्ह्यातील प्रवास हा केवळ पोलीस अधीक्षक म्हणून नव्हता तर नकळतपणे मी स्वतःला धुळेकर म्हणून अनुभवू लागलो होतो-आणि आता पुढे सतत राहील.

या प्रवासात धुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिक, सर्व मा लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, आयमा, एमआयडीसी संस्था,राजकीय पक्षाचे पदाधिकारी /प्रमुख आणि विशेषतः प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधी यांचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याबद्दल मी आपण सर्वांचा मनःपूर्वक आभारी आहे.

नवीन आव्हाने येत राहतात.. त्यानुसार बदलही होत रहातात ..

कल और आएंगे नग़मों की
खिलती कलियाँ चुनने वाले,
मुझसे बेहतर कहने वाले,
तुमसे बेहतर सुनने वाले
कल कोई मुझको याद करे,
क्यों कोई मुझको याद करे,
मसरूफ़ ज़माना मेरे लिये
क्यों वक़्त अपना बरबाद करे

माध्यमांचे केले कौतुक
लोकशाहीच्या चौथा स्तंभाने माझ्या कार्यकाळात वस्तुनिष्ठ बातम्या देऊन, पोलीस दलाची चांगली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवून आणि आवश्यक त्या ठिकाणी विधायक टीका करून तुम्ही सतत सजग ठेवले. अफवांवर नियंत्रण ठेवून आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी ही भूमिका अत्यंत मोलाची ठरली तसेच जातीय तणावांच्या प्रसंगी आपण संयम दाखवला याबद्दल आपले खूप आभार त्यामुळे परिस्थिती तत्काळ आटोक्यात येत गेली. आपण वेळोवेळी आधीच ग्राउंड लेव्हलची माहिती दिल्यामुळे पोलिसांना तयारीने प्रश्नांना सामोरे जाता आले ..

शेवटी इतकेच-
मंज़िल मुझे मिले ना मिले,
इसका ग़म नहीं,
मंज़िल की जुस्तजू में मेरा कारवाँ तो है




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !