भडगावात मीना समाजाचे जिल्हाध्यक्ष भगवान महेर जामडींसह पदाधिकार्यांचा सत्कार
भडगाव (मंगळवार, 6 ऑक्टोबर 2026) : भारतीय परदेशी मीना समाजाचे जळगाव जिल्हाध्यक्ष भगवान महेर जामडी तसेच सह-मीडिया प्रभारी अशोक काहीटे यांचा शहरात निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. चाळीसगावातील परदेशी-राजपूत उन्नती मंडळाचे पदाधिकारी व समाज बांधवांमार्फत पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
नूतन जिल्हाध्यक्ष भगवान महेर यांचा सत्कार भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेशआण्णा परदेशी यांनी केला. सह मिडीया प्रभारी अशोक काहीटे यांचा चाळीसगावातील परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाचे जेष्ठ संचालक सुभाष महाजन यांनी सत्कार केला. हा छोटेखानी सत्कार सोहळा पत्रकार अशोक काहीटे यांच्या निवासस्थानी साईनगर भडगाव येथे रविवार, 4 रोजी झाला.
यांची होती उपस्थिती
यावेळी भडगावचे माजी नगराध्यक्ष गणेशआण्णा परदेशी, चाळीसगाव परदेशी, राजपुत समाज उन्नती मंडळाचे ज्येष्ठ संचालक सुभाष महाजन, संचालक डॉ.जयसिंग परदेशी, सचिव निलेश राजपूत, समाजाचे कन्नड तालुकाध्यक्ष प्रकाश चांदा, जावळेतील भगवान लोदवाळ, नागदचे हिरामण महाजन, उन्नती मंडळाचे माजी संचालक सुरेश देटवाडे, भडगाव, समाजाचे जिल्हा उपाध्यक्ष हरीभाऊ परदेशी, नागदचे महादू जिभाऊ महेर, भडगाव समाजाचे तालुका सदस्य दीपक परदेशी (महिंदळे), संजय बडजावत (भडगाव), दिव्यांग प्रहार संघटनेचे भडगाव तालुकाध्यक्ष कर्तारसिंग परदेशी (महिंदळे), जावळेतील सामाजिक कार्यकर्ते नामदेव परदेशी यांच्यासह समाजबांधव उपस्थित होते.


